सूचना

महाराष्ट्र संगीत ऑलिम्पियाड परीक्षा

महाराष्ट्र म्युजिक ऑलिम्पियाड असोसिएशन आयोजित संगीत ऑलिम्पियाड परीक्षेसाठी खालील उद्दिष्टांनुसार नोंदणी सुरु आहे :-

 • तरुण, उत्साही मुलांना संगीताच्या क्षेत्रातील त्यांच्या प्रतिभेचा शोध घेण्यासाठी प्रोत्साहित करणे.
 • मुलांना त्यांच्यातील प्रतिभेचा पाठपुरावा करण्यासाठी आणि संगीत एक छंद म्हणून शिकण्यासाठी किंवा व्यवसाय म्हणून करण्यासाठी प्रोत्साहित करणे.
 • मुलांच्या आकांक्षांना पाठिंबा देण्यासाठी त्यांच्या पालकांना आत्मविश्वास देणे.

सामान्य सूचना

परीक्षेपूर्वी:

 • महाराष्ट्र संगीत ऑलिम्पियाड परीक्षा महाराष्ट्रातील पहिली ते दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी खुली आहे व दोन गटांमध्ये विभागलेली आहे.
  • गट अ- इयत्ता १ ली ते ४ थी
  • गट ब- इयत्ता ५ वी ते १० वी
 • एकूण ६ ग्रेडच्या परीक्षा असतील.
 • ग्रेड १ आणि ग्रेड २ ह्या लेखी परीक्षा (Objective) असतील.
 • ग्रेड ३ पासून ते ग्रेड ६ पर्यंत लेखी तसेच प्रात्यक्षिक परीक्षा देखील असतील.
 • शाळांनी परीक्षेसाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांची फी जमा करावी आणि शाळेचा वाटा वगळून शिल्लक फी खालील खात्यात BHIM App किंवा IMPS किंवा NEFT किंवा RTGS द्वारे हस्तांतरित करावी.
  • संक्रम म्युजिक प्रा. लि.
  • सारस्वत सहकारी बँक लि.
  • शाखा: आयटीआय रोड, औंध, पुणे
  • A/c. No. : 083100102744240
  • IFSC : SRCB0000083
 • नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी बँकेचा व्यवहार क्रमांक (UTR No.) अनिवार्य आहे.
 • एकदा भरलेले परीक्षा शुल्क परत दिले जाणार नाही.
 • महाराष्ट्र म्युझिक ऑलिम्पियाड परीक्षेसाठी विद्यार्थी नोंदणी प्रक्रिया संबंधित शाळेद्वारेच करणे बंधनकारक आहे. वैयक्तिक विद्यार्थी नोंदणी करण्याची परवानगी नाही.
 • परीक्षेसाठी नोंदणी प्रक्रिया खालील दिलेल्या वेबसाईट लिंकवरून फक्त ऑनलाइन करणे बंधनकारक आहे. (https://www.maharashtramusicolympiad.com/%E0%A4%AE-%E0%A4%96-%E0%A4%AF-%E0%A4%AA-%E0%A4%B7-%E0%A4%A0/ ) प्रत्यक्षरित्या कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
 • शाळा नोंदणी फक्त एकदाच करायची प्रक्रिया आहे. शाळा नोंदणी पूर्ण झाल्यानंतर, शाळेला Username Password पाठवला जाईल. Username Password वापरून शाळा वेळोवेळी लॉग इन करू शकते.
 • नवीन विद्यार्थी नोंदविण्यासाठी विद्यार्थी नोंदणी अनेक वेळा केले जाऊ शकते.
 • शाळेने काही विद्यार्थ्यांची नोंदणी करून सबमिट केले आणि पुन्हा अधिक काही विद्यार्थ्यांची नोंदणी करून सबमिट केले तर शाळेने विद्यार्थी यादी सबमिट केल्यानुसारच विद्यार्थ्यांची फी स्वतंत्रपणे हस्तांतरित करणे अनिवार्य आहे. यामुळे MMOA ला संबंधित विद्यार्थ्यांच्या फी तपशीलाची तपासणी करण्यास मदत होईल.

उदाहरण: जर शाळेने ५ विद्यार्थ्यांची नोंदणी करून सबमिट केले, तर शाळेला ५ विद्यार्थ्यांची फी हस्तांतरित करावी लागेल, तसेच जर पुन्हा शाळेने अधिक १० विद्यार्थ्यांची नोंदणी करून सबमिट केले तर शाळेला त्या वेळी त्या १० विद्यार्थ्यांची फी हस्तांतरित करावी लागेल.

 • शाळेने विद्यार्थ्यांची नोंदणी अनेकदा करून, सर्व विद्यार्थ्यांची यादी एकदाच सबमिट करावी व एकदाच परीक्षा शुल्क नोंदणीच्या अंतिम तारखेपूर्वी MMOA ला हस्तांतरित करावी.
 • अंतिम तारीख व वेळेनंतर विद्यार्थी नोंदणी स्वीकारली जाणार नाही.
 • परीक्षा आयोजित करण्यासाठी शाळेने परीक्षा वेळापत्रक यावर दिलेल्या ८ पर्यायांपैकी कोणतीही एकच तारीख निवडावी.
 • परीक्षेसाठी अभ्यासक्रम दोन स्वरुपात वेबसाईटवर उपलब्ध होईल. (https://www.maharashtramusicolympiad.com/%E0%A4%85%E0%A4%AD-%E0%A4%AF-%E0%A4%B8%E0%A4%95-%E0%A4%B0%E0%A4%AE/ )
  • शिक्षकांची संदर्भ प्रत - वेबसाईटवरून डाउनलोड केली जाऊ शकते.
  • अभ्यासक्रम व्हिडीओज - वेबसाइटवर विनामूल्य उपलब्ध आहेत.
 • पुढील ग्रेडसाठी पात्र होण्यास विद्यार्थ्याला किमान ४०% मिळवणे आवश्यक आहे.
 • ज्या विद्यार्थ्यांनी ४०% पेक्षा कमी गुण मिळवले आहेत त्यांना "सहभाग प्रमाणपत्र" मिळेल परंतु अश्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा फी भरून पुढील वेळापत्रकानुसार परीक्षा द्यावी लागेल.
 • ज्या विद्यार्थ्यांनी ४०% आणि ७९.९९% च्या दरम्यान गुण मिळवले आहेत त्यांना "पात्रता प्रमाणपत्र" मिळेल.
 • ज्या विद्यार्थ्यांनी ८०% व त्याहून अधिक गुण मिळविले आहेत त्यांना "श्रेणी प्रमाणपत्र" मिळेल.
 • पुढील ग्रेडसाठी अर्ज सादर करण्यास, विद्यार्थ्याने पूर्व सर्व ग्रेडमध्ये उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे.
 • जे विद्यार्थी परीक्षा देऊ शकले नाहीत किंवा कोणत्याही कारणास्तव उपस्थित राहू शकले नाहीत किंवा पूर्व ग्रेडमध्ये उत्तीर्ण झाले नाहीत असे विद्यार्थी पुन्हा परीक्षा फी भरून पुढील वेळापत्रकानुसार परीक्षा देऊ शकतात.
 • जी  शाळा ग्रेड - १ परीक्षेसाठी ५० व त्याहून अधिक नवीन विद्यार्थ्यांची नोंदणी करेल त्यांना "शाळा प्रशंसा प्रमाणपत्र" प्राप्त होईल.
 • ज्या शाळांनी "शाळा प्रशंसा प्रमाणपत्र" प्राप्त केले आहे त्या शाळांना  "शाळा उत्कृष्टता प्रमाणपत्र" देखील प्राप्त करता येऊ शकते जर त्यांच्या पैकी अधिकतम विद्यार्थी ग्रेड -1 च्या परीक्षेत मेरिट (८०% व त्याहून अधिक) प्राप्त करतील.

सामान्य सूचना

परीक्षा:

 • शाळेने निवडलेल्या तारखेला संबंधित शाळेतील कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांसाठी परीक्षा घेण्यात यावी.
 • प्रश्नपत्रिका, OMR उत्तरपत्रिका आणि उपस्थिती पत्रिका इ. सोबत Pre-Exam Kit परीक्षेच्या आठ दिवस आधी शाळांना पाठविले जाईल.
 • प्रश्नपत्रिकांबद्दल गुप्तता राखण्याची आणि सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी शाळेची राहील.
 • अनुपस्थित विद्यार्थी बदलून नवीन विद्यार्थ्यांना परवानगी दिली जाणार नाही.
 • Pre-Exam Kit मिळालेली शाळा, अद्ययावत झाल्यानंतरच हॉल तिकिट वेबसाइटवर उपलब्ध होतील. शाळेला नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना हॉल तिकीट डाऊनलोड करून, प्रिंट काढून द्यावे लागतील.
 • परीक्षेची भाषा (इंग्रजी किंवा मराठी) OMR उत्तरपत्रिकेवर मुद्रित केलेली असेल, तरी विद्यार्थ्यांनी आपल्या समंधित भाषेपुढील गोळा रंगविणे अनिवार्य आहे.
 • परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार शाळांनी वर्ग, पर्यवेक्षक, मदतनीस इत्यादींची व्यवस्था करणे आवश्यक आहे.
 • शाळेने त्यांच्या संदर्भासाठी उपस्थिती पत्रिकेची एक प्रत आपल्याकडे ठेवावी.
 • प्रत्येक विद्यार्थ्यांच्या फीज् मधुन रु. २५/- शाळेचा वाटा म्हणून शाळेला मिळतील.
 • शाळेच्या फी मधील वाट्याद्वारे स्थानिक खर्च केला जावा. यामध्ये प्रिंटआउट्स, झेरॉक्स, पर्यवेक्षक शुल्क, टपालखर्च इत्यादी खर्च समाविष्ट आहेत.
 • Pre-Exam Kit मध्ये परीक्षेसाठीच्या तपशीलवार सूचना पाठविल्या जातील.

पर्यवेक्षकांसाठी सूचना:

 • विद्यार्थ्यांनी परीक्षेदरम्यान लिखाण साहित्याशिवाय काहीही जवळ बाळगू नये.
 • परीक्षेच्या पूर्ण वेळेसाठी विद्यार्थ्याने परीक्षा वर्गात बसणे अनिवार्य आहे.
 • परीक्षा वर्गात एका बाकावर एकाच विद्यार्थ्याची बैठकीची व्यवस्था करावी.
 • Permanent Registration Number व बैठकीच्या व्यवस्थेनुसार विद्यार्थ्यांनी त्यांच्या संबंधित जागा घेतल्या आहेत याची खात्री करावी.
 • परीक्षा सुरू होण्याच्या १५ मिनिटे अगोदर विद्यार्थ्यांनी परीक्षा हॉलमध्ये बसणे अपेक्षित आहे.
 • विद्यार्थ्यांना परीक्षा सुरु होण्याच्या १० मिनिटे अगोदर OMR उत्तरपत्रिकांचे वाटप करावे.
 • विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीटाची तपासणी परीक्षा वर्गात करावी.
 • पर्यवेक्षकाने OMR उत्तरपत्रिकांचे गट व Permanent Registration Number नुसार वर्गीकरण करावे व त्या उत्तरपत्रिकांवर स्वाक्षरी करावी.
 • पर्यवेक्षकांनी अनुपस्थित विद्यार्थ्यांच्या OMR उत्तरपत्रिकांवरसुद्धा स्वाक्षरी करणे अनिवार्य आहे.
 • अनुपस्थित विद्यार्थ्यांच्या OMR उत्तरपत्रिका MMOA कडे परत पाठवणे अनिवार्य आहे.
 • कृपया विद्यार्थ्यांना OMR उत्तरपत्रिकेवरील मुद्रित सूचना वाचून आणि समजावून सांगाव्यात.

सामान्य सूचना

परीक्षेनंतर:

 • शाळांनी उपस्थिती पत्रिका व OMR उत्तरपत्रिका न दुमडता पॅक करणे गरजेचे आहे.
 • शाळांनी पाठवलेले Post-Exam Kit हे जलरोधक आहे याची खात्री करून घ्यावी.
 • अनुपस्थित विद्यार्थ्यांच्या OMR उत्तरपत्रिका MMOA कडे परत करणे आवश्यक आहे.
 • परीक्षा झाल्यानंतर, शाळेने २४ तासांच्या आत सरकारी टपाल सेवा किंवा खाजगी कुरिअरमार्फत उपस्थिती पत्रिका व OMR उत्तरपत्रिका MMOA कडे पाठविणे आवश्यक आहे. उपस्थिती पत्रिका व OMR उत्तरपत्रिका MMOA कार्यालयात परीक्षेच्या तारखेपासून सात दिवसांच्या आत खाली दिलेल्या पत्त्यावर पोहोचणे आवश्यक आहे. 

महाराष्ट्र संगीत ऑलिम्पियाड असोसिएशन,
अनुराग, प्लॉट नंबर -१०,
पुष्पक पार्क ऑफ आयटीआय रोड,
फॅब इंडिया लेन, औंध, पुणे – ४११००७ 

 • शाळांनी Post-Exam Kit पाठविल्यानंतर त्याचे कुरिअर तपशील वेबसाइट वर Post-Exam Kit from School to MMOA या टॅब वर भरणे अनिवार्य आहे.
 • शाळेने फीमधील वाट्याद्वारे टपाल किंवा कुरिअर शुल्क भरावे.
 • परीक्षांसाठी उपस्थित सर्व विद्यार्थ्याना "सहभाग प्रमाणपत्र" आणि "गुणपत्रक" मिळतील.
 • तिस-या ग्रेडपासून पुढे इच्छुक विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त फी भरून सेमिनार, कार्यशाळा आणि प्रशिक्षण सत्र आयोजित केली जातील.